Advertisement

छोट्या पडद्यावर वटपौर्णिमा, शशांक केतकर सपत्निक हजेरी लावणार!


छोट्या पडद्यावर वटपौर्णिमा, शशांक केतकर सपत्निक हजेरी लावणार!
SHARES

वास्तव जीवनातील सण-उत्सवांचे पडसाद छोट्या पडद्यावरही उमटत असतात. बुधवारी वटपौर्णिमा असल्याने ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ व ‘नवरा असावा तर असा’ या मालिकेतही हा सण पाहायला मिळेल.

‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ आणि ‘नवरा असावा तर असा’ कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकांनी आज आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सर्व सण साजरे करणाऱ्या या मालिकांमध्ये वटपौर्णिमाही साजरी होणार आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’मध्ये विभा, सुभद्रा, कामिनी यांच्यासोबत रमाची बहीणही वटपौर्णिमेच्या पूजेत सहभागी होणार आहे.


मालिकेमध्ये व्रत 

रमा तिथे पूजा करण्यासाठी न आल्याचं पाहून मात्र तिला आश्चर्य वाटणार आहे. “सात जन्म हाच नवरा मिळो”, असं म्हणत पत्नी ही पूजा करते. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून दिवसभर उपवास करून सती–सावित्रीचं हे व्रत मोठ्या भक्तीभावाने पार पाडलं जातं. ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेमध्ये हे व्रत पाहायला मिळेल.


वटपौर्णिमानिमित्त खेळ

‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमाच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये शशांक केतकरने त्याच्या बायकोसोबत म्हणजेच प्रियांकासोबत हजेरी लावली आहे. या भागामध्ये दोघांनीही गप्पांच्या ओघात बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. शशांकने तो प्रियांकाचं कसं कौतुक करतो हे देखील सांगितलं. वटपौर्णिमानिमित्त त्यांच्यासोबत खेळदेखील खेळण्यात आले. शशांकला टोपलीमधील फळे ओळखण्याचा टास्क दिला गेला, जो त्याने यशस्वीरीत्या पार पाडला. तसंच प्रियांकाने कार्यक्रमामध्ये वटपौर्णिमेची पूजादेखील केली आहे.



हेही वाचा - 

‘बे एके बे’ साठी संजय बनला शिक्षक

आमिर-सलमान-शाहरुख सोडा, मराठी सिनेमे पहा - सयाजी शिंदे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा