Advertisement

विसुभाऊंच्या 'कुटुंबाची' त्रिसहस्री वाटचाल!

विसुभाऊ बापट हे नाव मराठी रसिकांच्या चांगलंच परिचयाचं आहे. एखादी साधीशी गोष्टही काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची शैली लाभलेल्या विसुभाऊंनी 'वाक्यम रसात्मकं काव्यं' म्हणजेच रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात, असं म्हणत गेली ३८ वर्षे रसपूर्ण काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर आणण्याचं काम केलं आहे.

विसुभाऊंच्या 'कुटुंबाची' त्रिसहस्री वाटचाल!
SHARES

काही कार्यक्रम खरोखरच खूप वेगळे असतात. त्यांचं वेगळेपण रसिकांना इतकं भावतं की, तेच अशा कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद देत मोठं करतात. अशा काही मोजक्या कार्यक्रमांपैकी एक आहे 'कुटुंब रंगलंय काव्यात'. हा कार्यक्रम आता ३००० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचला आहे.


रसपूर्ण काव्याची गंगा

विसुभाऊ बापट हे नाव मराठी रसिकांच्या चांगलंच परिचयाचं आहे. एखादी साधीशी गोष्टही काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची शैली लाभलेल्या विसुभाऊंनी 'वाक्यम रसात्मकं काव्यं' म्हणजेच रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात, असं म्हणत गेली ३८ वर्षे रसपूर्ण काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर आणण्याचं काम केलं आहे. ओंकारसाधना, मुंबई निर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचं बीज नव्यानं रोवलं आहे.


कविता सादरीकरण

प्रस्थापित तसंच नवोदित कवींच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित कवितांचा संच घेऊन तीन दशकांहून अधिक काळ विसुभाऊ बापट 'कुटुंब रंगलय काव्यात' हा एकपात्री कार्यक्रम करत आहेत. एकही कवितेची पुनरुक्ती न करता कविता पाठ करून सलग ११ ते १५ तास कवितांचं सादरीकरण करण्याचा विक्रम विसूभाऊंच्या नावावर आहे. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

अविरत प्रतिष्ठान आणि क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ओमकार साधना, मुंबई निर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३००० वा महोत्सवी कार्यक्रम रविवारी ६ जानेवारीला रात्री ८.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विसुभाऊ बापट, शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवणार आहेत.


विनामूल्य प्रवेशिका

या कार्यक्रमासाठी नाट्यगृहाच्या बाल्कनीच्या प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. ३ जानेवारीपासून प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध होतील. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असं म्हंटलं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या कवींच्या दृष्टीतून हे जग जाणण्यासाठी आणि कवितेच्या या जगाची एक झलक अनुभवण्यासाठी रविवारी 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाच्या ३०००व्या महोत्सवी प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन विसुभाऊंनी मराठी रसिकांना केलं आहे.



हेही वाचा-

फ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली!

ही आहे 'दादा, एक गुड न्यूज आहे'ची पहिली प्रेक्षक!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा