जेनेलियाचं गिफ्ट पाहून रितेश झाला अवाक्


SHARE

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं १७ डिसेंबरला त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधल्या सर्वच कलाकारांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्याची पत्नी जेनेलियानं रितेशला एक स्पेशल गिफ्टच दिलं आहे. तिनं दिलेलं गिफ्ट पाहून तुम्ही चकितच व्हाल. नुकतीच भारतात लान्च झालेली 'टेस्ला' एक्स ही कार जेनेलियानं रितेशला गिफ्ट म्हणून दिली आहे.
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) onभारतात या कारची किंमत ५२ ते ६० लाखांच्या घरात आहे. 'टेस्ला' एक्स ही गाडी विजेवर चालणारी आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी १३५ किलोमीटर प्रति तास या वेगानं सुसाट धावते. विजेवर चालणारी गाडी असल्यानं आरटीओच्या करातून देखील सूट मिळाली आहे.
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) onरितेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गाडीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत रितेश म्हणाला की, '४० वर्षांच्या मुलाला विशीतील असल्याप्रमाणे कसं वागवायचं हे बायकोला नक्कीच माहीत आहे.'

एकमेकांना ९ वर्षे डेट केल्यानंतर रितेश आणि जेनिलियानं २०१२ मध्ये लग्न केलं. बॉलिवूडमधलं क्युट कपल असं देखील त्यांना म्हटलं जातं.हेही वाचा-

विजेवर धावणारी 'टेस्ला एक्स' मुंबईत दाखल


संबंधित विषय
ताज्या बातम्या