‘ऐ वतन...’ गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न

ऐ वतन या गाण्याचा प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी सभागृहात संपन्न झाला. मिलिंद जोशी यांचं हे गीत ख्यातनाम फिजिओथेरपिस्ट आणि गायिका डॉ. मीनल देशपांडे यांनी गायलं असून, संगीतकार आदित्य ओक यांनी संगीतबद्ध केलं आहे.

‘ऐ वतन...’ गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न
SHARES

देशाप्रती वाटणारी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर निर्माण झाल्या आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नादब्रह्म क्रिएशन्सने ‘ऐ वतन...’ हे आगळं वेगळं व्हिडीओ गाणं भारतीयांकरिता आणलं आहे.


मिलिंद जोशी यांचं गीत 

नुकताच या गाण्याचा प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी सभागृहात संपन्न झाला. मिलिंद जोशी यांचं हे गीत ख्यातनाम फिजिओथेरपिस्ट आणि गायिका डॉ. मीनल देशपांडे यांनी गायलं असून, संगीतकार आदित्य ओक यांनी संगीतबद्ध केलं आहे. संगीत संयोजन अमित पाध्ये यांचं आहे. रेकॉर्डिस्ट आणि वादक विजय दयाळ यांचं मोलाचं योगदान या गीतास लाभलं आहे.


महेंद्र पाटील दिग्दर्शनात 

चित्रपटसृष्टीतील लेखक, पटकथाकार महेंद्र पाटील यांनी या व्हिडीओ गाण्याच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. गीत प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले संगीतकार कौशल इनामदार यांनी ‘ऐ वतन...’ हे गाणं जणू काही एखाद्या भव्य चित्रपटाचाच भास निर्माण करणारं असल्याचं म्हटलं. याशिवाय दिग्दर्शक संतोष मांजरेकर, माजी सनदी अधिकारी जयराज फाटक, माजी सनदी अधिकारी जयंतराव देशपांडे, दिग्दर्शक हेमंत भालेकर तसंच कला आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.हेही वाचा -

रहस्य वाढवणार ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर!

अभिनेता विकी कौशल बनला गायक
संबंधित विषय