Advertisement

मुंबई, ठाणेसह कोकणात ४ दिवस पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट

पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

मुंबई, ठाणेसह कोकणात ४ दिवस पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट
SHARES

पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून (imd alert) माहिती देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा alert असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (weather forecast)

सोमवारी रात्री मुंबईत कुलाबा परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, कुलाबा वेधशाळेनुसार, 3.4 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शहरात हलक्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासात मुंबईत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबईत या आठवड्यात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. आठवडाभर ढगाळ आभाळ अपेक्षित असताना, 28 आणि 29 मे रोजी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे.

राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.

दरम्यान, दादर, शिवडी, माटुंगा, परळ आणि नवी मुंबईसारख्या लगतच्या भागात पावसाने हजेरी लावली. चालूवर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (Weather department) दिले आहेत.हेही वाचा

1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी

गूडन्यूज! मुंबईत ६ जूनपासून पावसाची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा