Advertisement

मुंबईतून चिमण्या नामशेष होण्याची ही आहेत ८ कारणं

जागतिक स्पॅरो डे, दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला मुंबईतून चिमणी हद्यपार होण्याची ८ कारणं सांगणार आहोत.

मुंबईतून चिमण्या नामशेष होण्याची ही आहेत ८ कारणं
SHARES

प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

‘जसा वाघ जंगलासाठी आहे, तशी चिमणी शहरासाठीच आहे’. चिमण्या शहरी वातावरणाचे जैव-सूचक कसे आहेत हे दर्शवतात. वाघाच्या संख्येत घट होण्यानं पर्यावरणाला धोका दर्शवला जातो. तसाच चिमण्यांच्या लोकसंख्येचा विचार केला जाऊ शकतो. मानव त्यासाठीच सामूहिकपणे जबाबदार आहे, असं स्पष्टीकरण चिमणीचे क्रूसेडर, शहरी वस्तीतील इतर सामान्य वनस्पती आणि जीवजंतूंचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी दिलं.

मोहम्मद यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, ते खासगी शहरी भागातील संवर्धन चळवळीत नागरिकांना सामील करून घेतात. एनएफएसच्या पुढाकारानं सकारात्मक परिणाम घडवून आणणारा जागतिक स्पॅरो डे, दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो.

आज आम्ही तुम्हाला मुंबईतून चिमणी हद्यपार होण्याची ८ कारणं सांगणार आहोत.  

१) झाडांवर हातोडा

झाडांची संख्या जितकी तितके पक्षी जास्त हे सर्व सामान्य ज्ञान आहे. मुंबईत झाडे तोडण्यामागील भिती म्हणजे चिमण्या आणि इतर पक्ष्यांचे अधिवास नष्ट होणं. पण थांबा, इमारतींमध्ये चिमण्यांची देखील घरटी आहेत ना? ते खरं आहे. पण तरी चिमण्या दुहेरी पेचप्रसंगाचा सामना करीत आहेत.

२. घरट्यांचा अभाव

मुंबईत काचेच्या इमारती म्हणजेच कॉर्पोरेट डेन्सनं अनेक जुन्या इमारतींची जागा घेतली आहे. ज्यामध्ये कुंपण घातलेले असते. त्यामुळे त्यांना घरटे बांधता येत नाही. घरटे तयार करण्यासाठी चिमण्या जुन्या इमारतींचा आसरा घेतात. जुन्या इमारतींना कुंपण घातलेले नसते. त्यामुळे दक्षिण मुंबईत तुलनात्मकदृष्ट्या चिमण्यांची संख्या अधिक आहे.

३) मूळ वनस्पतींची कमतरता

नेटिव्ह झाडे हे चिमण्यांचे नैसर्गिक निवासस्थान आहेत. त्यांना आहार देण्यासाठी नेटिव्ह झाडं कीटक प्रदान करतात. चिमण्यांना त्यांच्या सुरुवातीच्या वर्षात कीटकांचा आहार आवश्यक असतो.

४) आधुनिक किराणा दुकानं

जुन्या किराणा दुकानं खुली असायची. धान्याच्या गोणी बाहेर खुल्या करून ठेवल्या जायच्या. त्यामुळे चिमण्यांचा  तिकडे बिनधास्त वावर असायचा. पण आधुनिक किराणा दुकानं आता वातानुकुलित झाली आहेत. शिवाय धान्य पूर्वीसारखं गोणीत नाही तर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे चिमण्यांना धान्य खाण्यास उपलब्ध होत नाही.

५) पिकांवर रासायनिक फवारणी

शेतकरी पिकांना किटक लागू नये म्हणून रासायनिक फवारणी करतात. यामुळे किटकांचा नाश होतो. पण त्यासोबतच रासायनिक फवारणी केल्यानं चिमण्यांना खाता येत नाही.

६) मोबाईल टॉवर

सेल फोन किरणोत्सर्गी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि मोबाइल टॉवर्सनी तयार केलेले रेडिएशन चिमण्यांवर परिणाम करते. त्याचबरोबर हे देखील सूचित करते की किरणे देखील मनुष्यांसाठी हानिकारक आहेत. चिमण्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते. तसंच त्यांच्या मज्जासंस्थेचं देखील नुकसान करते.

७) मुंबईतील कचरा

मुंबईत कचऱ्याची समस्या तर सर्वांनाच माहित आहे. कचरा जास्त असल्यानं कावळे आणि भटक्या मांजरींच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, अधिक कचरा, चिमण्यांचा शिकार करणारे अधिक शिकारी.

८) वाढती अंधश्रद्धा

अंधश्रद्धेवर ठाम विश्वास असलेले मानव चिमण्यांचे सेवन करतात. कारण काहीजण चिमण्यांच्या नर प्रजातींचं सेवन केल्यानं कामत्तोजना वाढते असं समजतात.



हेही वाचा

प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिनच्या मदतीनं पश्चिम रेल्वे महसूल जमवणार

नवी मुंबई महानगरपालिका मियावाकी पद्धतीचा करणार वापर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा