Advertisement

मुंबईत अतिप्रदूषित हवा, हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. तापमानात घट होत असल्याने हवेतल्या धुलिकणात वाढ झालेली दिसून येत आहे.

मुंबईत अतिप्रदूषित हवा, हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली
SHARES

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. मुंबईची हवा अतिप्रदूषित झाली आहे.

'सफर' या संस्थेने हवेचे निरिक्षण नोंदवले आहे. या प्रदूषित हवेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं डॉक्टरांनी आवाहन केलं आहे.

तापमानात घट होत असल्याने हवेतल्या धुलिकणात वाढ झालेली दिसून येत आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा अतिशय वाईट आहे. तर भांडुप, वरळी, मालाड, अंधेरी, माझगाव, बोरीवली, चेंबूर आणि नवी मुंबईतली हवा प्रदूषित आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वाहनं नसल्याने प्रदूषण कमी घटलं होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.

प्रदूषित शरीरात गेल्यास फुप्फुस, हृदय, नाकपुड्या आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. शिवाय श्‍वसन, तसेच त्वचाविकार असणाऱ्या लोकांनी आणि विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.हेही वाचा -

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पून्हा समन्स


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा