Advertisement

मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबईतील सीएसएमटी, परळ, दादर, वडाळा, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी आणि नवी मुंबई या भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली.

मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
SHARES

गेले २ ते ३ दिवस प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण झाले आहेत. मात्र, रविवारी रात्री ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास मुंबईतील सीएसएमटी, परळ, दादर, वडाळा, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी आणि नवी मुंबई या भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याशिवाय शनिवारी सकाळी देखील पावसानं मुंबईतील अनेक ठिकाणी हजेरी लावली होती.

जोरदार पाऊस

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. त्याचप्रमाणं केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसंच, भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता होती.

वातावरण कोरडंच

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत सोमवारी वातावरण कोरडंच राहण्याची शक्यता आहे. परंतु, मंगळवारनंतर मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडू शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना पावसासाठी आणखी २ दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र मुंबईत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असली तरी, उकाडा काही कमी होत नाही आहे.     

तापमानात वाढ

मुंबईत किमान तापमानात रविवारी वाढ झाली होती. रविवारी सकाळी सांताक्रूझ येथे २८.८ तर कुलाबा येथे २९ अंश किमान तापमान नोंदवण्यात आलं होतं. तसंच, हे तापमान जूनमधील सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे १.४ आणि १.७ अंशांनी जास्त होतं. तर कमाल तापमानामध्येही रविवारी आणखी वाढ नोंदवण्यात आली. कमाल तापामान सांताक्रूझ इथं ३६.६ अंश सेल्सिअसवर पोहोचलं, तर कुलाबा इथं ते ३४.८ अंश सेल्सिअस इतकं होतं. सांताक्रूझ येथील तापमान जूनचा दुसरा आठवडा संपला तरी अजूनही चढेच आहे.

जूनमध्ये सर्वसाधारण कमाल तामपान ३२.४ अंश असते. परंतु, रविवारचं तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ४ अंशांनी अधिक होतं. त्यातच सांताक्रूझ इथं आर्द्रता ६६ टक्के तर कुलाबा येथे ८२ टक्के होती.         हेही वाचा -                                                                                          

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्यानं घसरला दहावीचा निकाल- विनोद तावडेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा