Advertisement

ठाण्यातील धबधबा, धरण आणि तलाव परिसरात जाण्यास मनाई

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील धबधबा, धरण आणि तलाव परिसरात जाण्यास मनाई
SHARES

ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब, तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. बऱ्याचदा या भागांमध्ये जीवितहानीच्या देखील घटना घडल्या आहेत. दुसरीकडे राज्यात आता मान्सून दाखल होत आहे. याशिवाय राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

अशावेळी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

'या' गोष्टींना बंदी :

१) पावसात वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं आणि त्यामध्ये पोहणं, धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, सेल्फी काढण्यास किंवा कोणत्याही स्वरुपाचं चित्रीकरण करण्यास बंदी 

२) पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगण्यास बंदी राहील.

३) वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवणं, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणं, इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणं कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

४) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थरमाकॉलचे आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर किंवा इतरत्र फेकण्यास बंदी. 

५) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेड काढणं, टिंगल टवाळी करणं, महिलांशी असभ्य वर्तन करणं, असभ्य अश्लिश हावभाव करणं असे कोणतेही वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

६) नमूद केलेल्या ठिकाणी असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली १ किलोमीटर परीसरात ८ जून २०२१ ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.



हेही वाचा

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा