Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण, तलाव परिसरात जाण्यास बंदी

खालापूर तालुक्यातील १२ व कर्जत तालुक्यातील ११ धबधबे, धरण, तलाव क्षेत्रात नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे.

कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण, तलाव परिसरात जाण्यास बंदी
SHARES

हवामान खात्याने १० आणि ११ जून रोजी रायगड (raigad) जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व वादळीवाऱ्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खालापूर (khalapur) आणि कर्जत (karjat) परिसरातील तलाव (lake), धरण (dam) आणि धबधब्यांवर (waterfalls) जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कर्जत, खालापूर तालुक्यातील  २३ ठिकाणी पर्यटकांना (tourist) जाण्यास बंदी (ban) घालण्यात आल्याचं कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी सांगितलं.

खालापूर तालुक्यातील १२ व कर्जत तालुक्यातील ११ धबधबे, धरण, तलाव क्षेत्रात नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. खालापूर तालुक्यात झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाण वरोसे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामण कातरवाडी धरण, कलोते धरण आदी ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील आषाणे कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण/पाझर तलाव, पळसदरी धरण, कोढांणे धरण धबधबा, पाली भुतवली धरण, नेरळ जुम्मापट्टी धरण, बेडीसगाव धरण, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा आदी ठिकाणी प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळी पेक्षा कमी आहे. कुंडलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी या सहा मुख्य नद्या रायगडमध्ये आहेत. सावित्री आणि कुडंलिका नदी अतिधोकादायक समजली जाते. त्यामुळे पावसाळ्यात या नदी परिसराकडे न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हेही वाचा -

मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

Mumbai rains: १३ जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा