Advertisement

मुंबईकरांनो सावधान! समुद्र किनाऱ्यांवर जाणं टाळा, नाहीतर...

मोठा पाऊस, वारा यामुळे हे जलचर किनाऱ्यावर येतात. हे मृत झाल्यासारखे दिसले तरी ते दंश करू शकतात.

मुंबईकरांनो सावधान! समुद्र किनाऱ्यांवर जाणं टाळा, नाहीतर...
SHARES

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जुहूच्या किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिश पाहायला मिळत आहेत. दोन-तीन दिवसांपासून त्यांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अजूनही निर्बंधांमुळे किनाऱ्यावर फिरण्यासाठी जाण्याची सकाळचा ठराविक वेळ वगळता परवानगी नाही. तरी पाऊस कमी असल्यानं नागरिक किनाऱ्यावर येत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रविवार संध्याकाळपर्यंत जुहू आणि वर्सोवा किनाऱ्यावर जेलीफिशसंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार आहेत.

किनाऱ्यावर आलेल्या ब्ल्यू बॉटल जेली फिशमुळे आता अधिक सतर्कता बाळगली जात आहे. गेल्या चार दिवसांमध्ये किनाऱ्यावर वारा अधिक होता. त्यामुळे हे प्रमाण वाढलं असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही तज्ञांचा असा विश्वास आहे की, हे समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या तापमानामुळे ते किनाऱ्यावर येतात.

रविवारी सकाळी जेलीफिशच्या दंशामुळे दोन नागरिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या किनाऱ्यावर फिरू नये, असं आवाहन महापालिका आणि पोलिस सातत्यानं करत आहेत.


काय खबरदारी घ्यावी?

१) समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या सुचनांच्या फलकांकडे दुर्लक्ष करू नये.

२) जर समुद्र किनारी किंवा पाण्यात जाण्यास मनाई केली असेल तर त्या नियमांचं पालन करावं  

३) समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळण हा उत्तम पर्याय आहे.

४) सुचनांकडे दुर्लक्ष करत समुद्र किनारी गेलातच तर विना चप्पलचे वावरू नये.

५) अनेक महारथी फोटो काढण्यासाठी जेलीफिश हातात घेतात. असं करणं अधिक धोकादायक आहे.  

६) दंश झाल्यास घाबरूनन जाता आम्ही सांगितलेलेउपाय करू शकता. 


दंश झाल्यास काय कराव?

  • जेलीफिशच्या दंशानं त्या भागात जळजळ होते आणि लाल पुरळांसह सूज येते.
  • तज्ञांनी असं सुचवलं आहे की, सर्वोत्तम मार्ग म्हणजे दंश केलेल्या भागावर समुद्राचे पाणी लावणं.
  • त्या भागास खाजवू आणि चोळू नये.
  • दंश केलेला भाग किंवा जखम कोमट पाण्यानं धुऊ शकता.
  • दंश केलेल्या भागावर बर्फानं शेक देऊ शकता.
  • त्यानंतर पीडितांनं रुग्णालयात जावं.

सागरी जीव अभ्यासक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप पाताडे यांनी दोन-तीन दिवसांपासून जुहू किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेली फिश यायला सुरुवात झाल्याची माहिती दिली. हे जलचर खोल समुद्रात असतात. मोठा पाऊस, वारा यामुळे हे जलचर किनाऱ्यावर येतात. हे मृत झाल्यासारखे दिसले तरी ते दंश करू शकतात.

ब्ल्यू बॉटल जेलीफिश या जलचरांना पारदर्शक फुग्यासारखा भाग असतो. त्याखाली निळ्या रंगाचे धाग्यासारखे शुंडक असतात. या शुंडकांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अत्यंत वेदनादायी असतो.

२०१८ मध्ये, मुंबईच्या अनेक किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेलीफिश आढळल्या होत्या. गिरगाव चौपाटी, जुहू आणि अक्सासारख्या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर लहान मुलांसह १५० हून अधिक लोकांना जेलीफिशनं दंश केला होता.हेही वाचा

राज्यात अतिवृष्टीमुळं ३०० जणांचा मृत्यू

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिका अधिकाऱ्यांना देणार इलेक्ट्रिक वाहनं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा