Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डिजिटल मॅपिंग करण्याचा पालिकेचा प्रस्ताव

या प्रकल्पामुळे पालिकेला विकास क्षेत्रांच्या सीमा ओळखण्यात मदत होईल.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डिजिटल मॅपिंग करण्याचा पालिकेचा प्रस्ताव
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) सभोवतालच्या बफर झोनचे (४ किलोमीटरपर्यंत) सीमांकन करण्यासाठी डिजिटल नकाशे तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

या प्रकल्पामुळे पालिकेला विकास क्षेत्रांच्या सीमा ओळखण्यात मदत होईल. कारण या प्रस्तावात नकाशांवर सुपरइम्पोजिंग डेव्हलपमेंट प्लॅन २०३४ देखील समाविष्ट आहे.

२०१६ मध्ये, केंद्रानं SGNP हा इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला होता आणि त्याच्या अधिसूचनेनुसार, या क्षेत्रासाठी एक प्रादेशिक योजना तयार करायची आहे. त्यानुसार पालिकेनं आता एसजीएनपीचा डिजिटल नकाशा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हवाई छायाचित्रण केले जाणार असून, पालिका परिसराचा झोनल मास्टर प्लॅन तयार करणार आहे.

आरे इथल्या वादग्रस्त मेट्रो कारशेडच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा या प्रस्तावाचा उद्देश आहे. SGNP च्या सीमा स्पष्टपणे परिभाषित करणार्‍या झोनल मास्टर प्लॅनमुळे इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये पुढील विकासासाठी जागा उरणार नाही.

हा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी महापालिकेनं खासगी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ३.४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कंत्राट दिल्यानंतर २४ महिन्यांत ही योजना पूर्ण करायची आहे. हे काम ८ टप्प्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर देयके जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.

हा प्रकल्प विद्यमान जमिनीचा वापर, जैवविविधता, स्थलाकृति, पर्यावरण-संवेदनशील आणि परिसराच्या विकास योजनांचे सीमांकन करेल. पाणी पुनर्संचयित आणि व्यवस्थापन, सध्याच्या पाण्याचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ते केलं जाईल, असं प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

एका प्रशासकिय अधिकाऱ्यानं सांगितलं की, “या डिजिटल मॅपिंगचा अर्थ असा आहे की, आमच्यासमोर एक झोनल नकाशा तयार असेल, ज्यामध्ये विकास योजना नकाशे सुपरइम्पोज्ड असतील. याद्वारे, आम्हाला समजेल की कोणती क्षेत्रे इको-सेन्सिटिव्ह आहेत, जेणेकरून अशा क्षेत्रांचा पुढील विकास रोखला जाईल.”



हेही वाचा

लस घेतली नाही तर पगार नाही, ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

जंगलासाठी पालिकेचं उद्यान विभाग नवीन भूखंडांच्या शोधात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा