या झाडांची निगा राखणार कोण?

 RC Marg
या झाडांची निगा राखणार कोण?

आर. सी. मार्ग - चेंबूरच्या आरसी मार्गावर मोनो रेल्वे सुरू झाल्यानंतर एमएमआरडीएकडून मोनोच्या खांबाखाली झाडं लावून हा परिसर सुशोभित करण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने काही दिवस या झाडांना पाणी दिल्यानंतर अचानक पाणी देणं बंद केलं. त्यानंतर ही झाडे सुकून मरून गेली होती. असाच प्रकार गेल्या वर्षी देखील झाला होता. या वर्षी देखील एमएमआरडीएने गेल्या महिनाभरापासून संपूर्ण आरसी मार्गावर विविध प्रकारची शोभेची झाडे लावली आहेत. मात्र यावेळी तरी या झाडांची योग्य निगा राखून त्यांना वेळेवर पाणी देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कुमार गायकवाड यांनी केली आहे.

Loading Comments