मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?

Mumbai
मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?
मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?
मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?
मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?
मुंबईचा अधिकृत पक्षी कोणता हे माहीत आहे का?
See all
मुंबई  -  

आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे सर्वांनाच माहिती असेल. समजा एखाद्याला माहीत नसेल तर, राजस्थानच्या उच्च न्यायालयाचे जस्टिस महेश चंद्र शर्मा यांनी केलेल्या `त्या` वक्तव्यानंतर तरी आपला राष्ट्रीय पक्षी मोर असल्याचं सर्वांनाच कळालं असेल. पण तुम्हाला मुंबईचा अधिकृत पक्षी कोण असं विचारलं तर? मला खात्री आहे की १०० पैकी ९९ टक्के लोकांकडे या प्रश्नांचं उत्तर नसेल. आम्ही तुम्हाला अशाच एका पक्षाची ओळख करून देणार आहोत.


मुंबईचा अधिकृत पक्षी आहे 'तांबट'. हा पक्षी पुकपुक, सोनार या नावानंही ओळखला जातो. तर इंग्रजीत कॉपरस्मिथ या नावानं ओळखला जातो.मुंबईचा अधिकृत पक्षी म्हणून कशी मिळाली ओळख?

२൦११ मध्ये तांबट या पक्ष्याला मुंबईचा अधिकृत पक्षी म्हणून ओळख मिळाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)नं ऑनलाईन सर्व्हे केला होता. या सर्व्हेत तांबट या पक्ष्याला ३൦൦൦ मतं मिळाली. अशा प्रकारे मुंबईचा अधिकृत पक्षी म्हणून तांबट या पक्षाची निवड झाली. तांबट पक्ष्याने फ्लेमिंगो, ओरिएंटल मॅगपी रॉबीन आणि कावळा या पक्ष्यांना हरवून मुंबईचा अधिकृत पक्षी हा किताब पटकावला.  'तांबट'ची वैशिष्ट्ये 

तांबट पक्ष्यांच्या गळ्यावर आणि डोळ्याभवती पिवळा रंग असतो. पोटाच्या बाजूस पांढरट रंग आणि त्यावर हिरव्या रेघा असतात. छाती आणि कपाळावर लाल रंगाची पिसं असतात. काळी मजबूत चोच आणि डोक्यावर लाल रंगाचा टिळा असतो. या पक्ष्याचा आवाज हीसुद्धा त्याची ओळख आहे असं म्हणता येईल. झाडाच्या वठलेल्या फांद्यांमध्ये चोचीनं खोदून तांबट घरटं करतो. जेव्हा तो घरटं करतो तेव्हा `टकटक` असा आवाज येतो. त्यामुळे त्याला टकटक या नावानंही ओळखलं जातं.तांबट पक्ष्यांचा घरचा पत्ता

हिरव्या झाडांमध्ये मिळून मिसळून जाणारा तांबट आपल्यापासून अगदी जवळ असतो. एखाद्या वडाच्या झाडाखाली उभे असाताना तुम्हाला टक-टक आवाज ऐकू आला तर समजून जा की हा तांबट पक्षी आहे. पिंपळ, अंजीर, जांभूळ या झाडांवर तो आढळतो. शेवगा, काटेसावर, शिरीष, आंबा, गुलमोहोर, चिंच या झाडांच्या वठलेल्या फांद्यामध्ये चोचीनं खोदून घरटं केलं जातं. घरात जाण्यासाठी नळीसारखा प्रवेशमार्ग असतो. या नळीच्या शेवटी अंडयाची कोठी असते. तांबटाचं घरटं नेहमी फांदीच्या खालच्या बाजूला असतं.तांबट पक्ष्याचे अन्न

वड, पिंपळ या झाडाची पळं हे तांबट पक्ष्यांचे मुख्य अन्न. तसंच उडणारे किडे किंवा फुलपाखरंही ते खातात. जर, तुम्हाला कधी झाडाखाली टकटक असा आवाज आला तर समजून जा की, हा तांबट पक्षी आहे. कदाचित नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला तांबट पक्षी पाहण्याची संधी देखील मिळेल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.