होळीच्या नावाखाली प्लॅस्टिकचा वापर

 Mumbai
होळीच्या नावाखाली प्लॅस्टिकचा वापर

मुंबई - होळीचा सण आला की जनजागृती सुरु होते. पाणी वाचवा, नैसर्गिक रंगांचा वापर करा. पण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. ती म्हणजे प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या. लहान मुलं या पिशव्यांमध्ये रंगाचे पाणी भरून एकमेकांवर, येणाऱ्या जाणाऱ्यांवर फेकत असतात. पण याकडे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय.

मुख्य मुद्दा म्हणजे 50 मायक्रोनच्या आतील प्लास्टिक बॅगवर बंदी आहे. असं असताना देखील फक्त याच्या वापरावर बंदी आहे. पण प्रोडक्शनवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले जातात. प्रतिबंधीत प्लास्टिक बॅगचे होणारे दुष्परिणाम दाखवले जातात. पण नाले, समुद्र किनारे, कचऱ्याच्या कोंडाळ्या, सर्वत्र प्लास्टिकचा खच साचलेला असतो. पण या मुख्य समस्येकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, याबाबत पर्यावरण तज्ज्ञ शरद यादव यांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराला दोष देत पर्यावरण खात्याच्या वतीने कडक निर्देश देण्यात आले असून देखील पालिका कारवाई करण्यास तयार नसल्याचे सांगितले. पालिकेच्या लायसन्स डिपार्टमेंटला केमिकल युक्त रंग जप्त करण्याचे तसेच प्लास्टिक वापरावर छापे टाकण्याचे आणि प्रतिबंध पूर्णपणे अंमलात येईल याची खात्री करण्याचे अधिकार असून देखील याकडे पालिका कानाडोळा करत असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर फिरते कारवाई पथक सर्व विभागात नेमण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले.

Loading Comments