झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती कायम

 Mumbai
झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती कायम

मुंबई- मेट्रो-3 प्रकल्पासाठी होणाऱ्या झाडाच्या कत्तलीस उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. ही स्थगिती पुढील दोन आठवड्यांसाठी न्यायालयाने कायम ठेवल्याची माहिती याचिकाकर्ते झोरू बाथेना यांनी दिली आहे. मेट्रो- 3 साठी झाडे कापण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत एमएमआरसीने स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र झाडांना बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्यांची कत्तल करणार का? असा सवाल न्यायालयाने विचारत स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. तर झाडे तोडल्याने पर्यावरणाचे नुकसान होणार तेव्हा मुंबईकरांनी काय करायचे दुसऱ्या ग्रहावर जायचे का? असा सवाल करत एमएमआरसीला चपराक दिली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 10 मार्चला होणार आहे.

Loading Comments