Advertisement

मुंबईत ३ दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे.

मुंबईत ३ दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
SHARES

मुंबईत बुधवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी येणारे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पुढील 3 दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली. मात्र, महाराष्ट्रात परतीचा पाऊस थैमान घालू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पोषक हवामानाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 3 दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि भंडारा तसेच संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.हेही वाचा

राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा