Advertisement

देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज

पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज
SHARES

देशात यंदा  सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे.  हवामान खात्याने पहिला मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी पाऊस ९६ टक्क्यांपासून १०४  टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

 हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदाही त्याहून चांगली परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक ३५ ते ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे

ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या ९८ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानलं जातं. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असं मानलं जातं. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानलं जातं. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतीवृष्टी मानली जाते.



हेही वाचा

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा