Advertisement

पुढचे ३ तास धोक्याचे, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या तीन तासांत तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढचे ३ तास धोक्याचे, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट
SHARES

अवकाळी पावसानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना दोन दिवसात झोडपलं (Weather warning maharashtra) आहे. सोमवारी मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवा होती.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, (new cast warning maharashtra weather) पुढच्या तीन तासांत तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात जोरदार गारपीटही होऊ शकते, असा इशारा हवामान विभागानं (IMD ) दिला आहे.

IMD Mumbai ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाद जिल्ह्यांत पुढचे ३ तास धोक्याचे असतील. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाचे डॉ. के. एस होसाळीकर यांनी याबाबत Tweet करून माहिती दिली आहे.

रात्री १० वाजता हवामान विभागानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अधिक उंचीवर दाट ढग जमा झाल्यानं नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी मोठ्या गारा (Hail strom) पडण्याचीही शक्यता आहे. ताशी ३०-४० किमी वेगानं वारे वाहू शकतात. या वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

विजांचा पाऊस सुरू झाल्यास शक्यतो गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, झाडाखाली किंवा मोडकळीला आलेल्या इमारती, भिंतीखाली उभे राहू नका, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.हेही वाचा

Aarey Forest: मुंबईतील सर्वात मोठ्या जंगलाबद्दल जाणून घ्या

मुंबईतून चिमण्या नामशेष होण्याची ही आहेत ८ कारणं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा