Advertisement

मुंबईत १७ जूनला मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं (आयएमडी) मुंबईत १७ जूनला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा मनसोक्त भिजण्याचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबईत १७ जूनला मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या पावसामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला खरा. मात्र दुसऱ्या आठवड्यात पावसानं दांडी मारल्यानं उन्हामुळे मुंबईकरांची पुन्हा लाही-लाही होत आहे. मात्र भारतीय हवामान विभागानं (आयएमडी) मुंबईत १७ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा गारव्यासह मनसोक्त भिजण्याचा अनुभव घेता येणार आहे.


१७, १८ जूनला मुसळधार

मुंबईत ९ जून रोजी चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसानं दडी मारली. मात्र मुंबईसह कोकणपट्ट्यात १७ आणि १८ जूनला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीनं व्यक्त केला. यासह कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेनं मुंबईसह उपनगरांमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी वातावरणातली आर्द्रता वाढल्याचीही नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळांनी केली.हेही वाचा - 

मुंबईत पावसाचा जोर ओसरणार

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा