Advertisement

मुंबईचा पारा ३७ अंशावर, राज्यात सर्वाधिक तापमान

पुढील २ दिवस म्हणजेच मंगळवार आणि बुधवारीही मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश, तर किमान तापमानाही २५ अंशाच्या आसपास राहिल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईचा पारा ३७ अंशावर, राज्यात सर्वाधिक तापमान
SHARES

रविवारपाठोपाठ सोमवारीही मुंबईच्या तापमानात वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी मुंबईतलं तापमान राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक हाेतं. पुढचे २ दिवस म्हणजेच मंगळवार आणि बुधवारीही तापमान चढंच राहणार असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.


किती होतं सोमवारी तापमान

राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सोमवारी मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी कुलाब्यात ३४.३५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझमध्ये ३५.५ अंश सेल्सिअस इतकं तापमान नाेंदवण्यात आलं होतं. यामध्ये सोमवारी सरासरी २ अंशांची वाढ होऊन मुंबईतलं तापमान ३७.५ अंश सेल्सिअसवर गेलं होतं.

पुढील २ दिवस म्हणजेच मंगळवार आणि बुधवारीही मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश, तर किमान तापमानाही २५ अंशाच्या आसपास राहिल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.


तापमानवाढीचं कारण काय?

पंधरवड्यापूर्वी लुबान वादळ अरबी समुद्राच्या वेशीवर आलं होतं. या वादळाने ओमानच्या आखाताकडे दिशा वळवल्याने मुंबईतील तापमानात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील तापमानात वाढ बघायला मिळत आहे.



हेही वाचा-

आरेमधील झाडांच्या कत्तलीसंदर्भातील जनसुनावणीत राडा; वृक्ष प्राधिकरणाला पर्यावरणप्रेमींनी धरलं धारेवर

टपालवाडी वॉटरफॉल परिसरातून ७५० किलो कचरा साफ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा