Advertisement

आरेमधील झाडांच्या कत्तलीसंदर्भातील जनसुनावणीत राडा; वृक्ष प्राधिकरणाला पर्यावरणप्रेमींनी धरलं धारेवर

राणीबागेत बुधवारी मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी, सेव्ह आरे-सेव्ह ट्री चे सदस्य, आदिवासी बांधव, सामान्य नागरिक इतकंच काय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली. झाडांच्या कत्तलीला असलेला आपला विरोध प्रकर्षानं मांडला.

आरेमधील झाडांच्या कत्तलीसंदर्भातील जनसुनावणीत राडा; वृक्ष प्राधिकरणाला पर्यावरणप्रेमींनी धरलं धारेवर
SHARES

मुंबईतील पर्यावरणप्रेमी, सेव्ह आरेराणीबागेत बुधवारी मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी, सेव्ह आरे-सेव्ह ट्री चे सदस्य, आदिवासी बांधव, सामान्य नागरिक इतकंच काय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली. झाडांच्या कत्तलीला असलेला आपला विरोध प्रकर्षानं मांडला. -सेव्ह ट्री सदस्य आणि आरेतील आदिवासी बांधवांचं लक्ष लागलं होतं ते बुधवारच्या आरे कारशेडमधील झाडांच्या कत्तलीसंदर्भातील जनसुनावणीकडं. काहीही झालं तरी आरेतील एकही झाडं कापू द्यायचं नाही, आरे वाचवायचं असा निर्धार करत गेल्या पंधरा दिवसांपासून पर्यावरणप्रेमींनी अक्षरक्ष सुचना-हरकतींचा पाऊस पाडला होता. त्यामुळं ही जनसुनावणी वादळी ठरणार असं चित्र होतं. त्यानुसार ही जनसुनावणी चांगलीच वादळी ठरली.




अधिकारी पळाले 

राणीबागेत बुधवारी मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी, सेव्ह आरे-सेव्ह ट्री चे सदस्य, आदिवासी बांधव, सामान्य नागरिक इतकंच काय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली. झाडांच्या कत्तलीला असलेला आपला विरोध प्रकर्षानं मांडला. मेट्रो प्रकल्पाला आपला विरोध नाही. पण प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्याला विरोध आहे. प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) सारखी सरकारी यंत्रणा बेकायदेशीररित्या काम करत आहे. त्याला विरोध आहे, असं म्हणत उपस्थितांनी या झाडांच्या कत्तलीला विरोध केला. मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला धारेवर धरलं, प्रश्न विचारून भांडावून सोडलं. तर पर्यावरण प्रेमींच्या प्रश्नांचं उत्तर देता न आल्यानं वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मागच्या दारानं पळ काढावा लागला.


३० हजार हरकती

आरे कारशेडसाठी २७०२ झाडांच्या कत्तलीसाठी एमएमआरसीनं वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणानं एका जाहीर निवेदनाद्वारे सुचना-हरकती मागवल्या होत्या. अगदी काही दिवसांच्या काळातच ३० हजारांच्या आसपास सुचना-हरकती सादर झाल्या नि यातून आरे कारशेडला, झाडांच्या कत्तलीला असलेला विरोध प्रकर्षानं समोर आला.  या सुचना-हरकतीनुसार बुधवारी अडीच वाजताच्या दरम्यान राणीबागेत जनसुनावणी पार पडली. यावेळी मनसेही पर्यावरणप्रेमींच्या बाजूनं उभी ठाकली.  सर्वांनीच झाडांच्या कत्तलीला जोरदार विरोध केल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी दिली आहे.



पर्यावरणप्रेमी यशस्वी

या जनसुनावणीवेळी वृक्ष प्राधिकरणाकडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  हजाराहून अधिक जणांनी जनसुनावणीला हजेरी लावल्याचं दिसून आलं. यावेळी काही नागरिकांना वृक्ष प्राधिकरण अाणि पोलिसांकडून आत जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे नागरिक आक्रमक झालेले पहायला मिळाले. एकूणच झाडांच्या कत्तलीला बुधवारी जोरदार विरोध करत आपली भूमिका ठामपणे मांडण्यात पर्यावरणप्रेमी यशस्वी ठरल्याचं दिसून अालं. तर आता याबाबत वृक्ष प्राधिकरण नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

बीकेसीत आढळले १० आणि १५ फूट लांबीचे अजगर

 टपालवाडी वॉटरफॉल परिसरातून ७५० किलो कचरा साफ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा