Advertisement

मुंबई गारठली, थंडीचा कडाका अाणखी वाढणार

मुंबईत दिवसा उत्तर आणि वायव्येकडून गार वारे वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानामध्ये फरक जाणवायला सुरुवात झाली आहे. बुधवारी भर दुपारी मुंबईकरानी थंडीचा अनुभव घेतला.

मुंबई गारठली, थंडीचा कडाका अाणखी वाढणार
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत सांताक्रुझ परिसरात गुरुवारी सकाळी १२.४ अंश तर कुलाबा परिसरात १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. १ जानेवारीपर्यंत तापमानात आणखी घट होणार असून महराष्ट्रसह मुंबईत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थर्टी फर्स्ट यंदा शाल, स्वेटर घालून साजरा करावा लागणार आहे. 


उत्तर, वायव्येकडून गार वारे 

मुंबईत दिवसा उत्तर आणि वायव्येकडून गार वारे वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानामध्ये फरक जाणवायला सुरुवात झाली आहे. बुधवारी भर दुपारी मुंबईकरानी थंडीचा अनुभव घेतला. सांताक्रूज परिसरात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर कुलाबात १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे गुरुवारी किमान तापमानत आणखी घट झाली असून सांताक्रुज परिसरात १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुलाबा परिसरात १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 


संध्याकाळी सहानंतर थंडी 

 गुरुवारी कमाल तापमानाचा पारा सरासरी कमाल तापमानापेक्षा खाली उतरला अाहे. कुलाबा येथे कमाल तापमान २८.६ तर सांताक्रूझ येथे २९.० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पहाटेसह दुपारीही गार वारे वाहत असून मुंबईतील तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. संध्याकाळी सहानंतर मुंबईकरांना थंडी वाढू लागल्याने मुंबईकरांच्या शाली, स्वेटर, कानटोप्या कपाटाबाहेर आलेल्याचं चित्र पाहायला मिळत अाहे. १ जानेवारीपर्यंत मुंबईत तापमानात अशीच घट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



हेही वाचा - 

थर्टी फर्स्टला दुकानं रात्रभर सुरू ठेवा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा