Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

२४ तासात ३२८ मिमि पावसाची विक्रमी नोंद

मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवार रात्रीपर्यंत बरसला. २४ तासात ३२८ मिमि पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

२४ तासात ३२८ मिमि पावसाची विक्रमी नोंद
SHARES

बुधवारी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं. पावसाचा रस्ते वाहतुकिसोबतच रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला. मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवार रात्रीपर्यंत बरसला. २४ तासात ३२८ मिमि पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमध्ये ३२८.२८ मिमी, बेलापूरमध्ये ३२०.८० मिमी, विक्रोळीमध्ये २९०.८६ मिमी, मुंब्रामध्ये २४७.१० मिमी, कोपरखैरणेमध्ये २४२.३० मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी झालेल्या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा ठप्प झाली. ६ जागी घरे तर ३२ वृक्ष कोसळले. १४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. हिंदमाता, वडाळा, कुर्ला, माटुंगा, दादर सर्कल, खार, गोवंडी, चेंबूर, वांद्रे, अंधेरीत रस्त्यावर पाणी तुंबले होते. पालिकेचे २०० पंप पाणी उपसत होते.

मुंबईत गुरुवारी १२ वाजून १७ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून ४.२६ उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी समुद्रास सकाळी ११.४३ वाजता ४.१६ मीटरची मोठी भरती होती. त्यामुळे तुफान पावसामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही.

दरम्यान, गुरुवारी सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. पण भारतीय हवामान विभागानं मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.हेही वाचा

Mumbai Rains: १३ जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकणात ढगफुटीचा इशारा, हवामान खात्याकडून हाय अलर्ट जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा