Advertisement

कोकणात ढगफुटीचा इशारा, हवामान खात्याकडून हाय अलर्ट जाहीर

भारतीय हवामान खात्यानं कोकण विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोकणात ढगफुटीचा इशारा, हवामान खात्याकडून हाय अलर्ट जाहीर
SHARES

सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. अशातच भारतीय हवामान खात्यानं (IMD) कोकण विभागाला सतर्कतेचा (High alert to Konkan) इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी (Cloudburst) होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे.

मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात ११ आणि १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादिवशी रत्नागिरीत पडणारा पाऊस ढगफुटी प्रमाणे असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

११ आणि १२ जून या दोन दिवशी खबरदारी म्हणून जिल्ह्यात कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिकेतील ३१ गावांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर नदीला पूर येऊन पाणी संबंधित गावात शिरू शकते. त्यामुळे या गावांना अधिक धोका आहे.

१० आणि ११ जूनला रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक असणार आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबईत (Mumbai Rains) मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक सखळ भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. रस्ते वाहतुकिसोबतच रल्वे सेवेवर देखील पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. रेल्वे रुळ देखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कुर्ला ते CSMT आणि दादर ते चर्चगेट या मार्गांवरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

हवामान खात्यानं ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. ९, १०, ११ आणि १२ असे चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार अशल्याचं त्यांनी आधीच वर्तवलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. यासोबतच पालिकेनं नागरिकांना आवाहन केलं आहे की, आवश्यक्ता नसेल तर घराबाहेर पडणं टाळावं.

वसई विरारसह ग्रामीण भागातील आणि किनारपट्टीच्या गावातील सर्व लोकांना तलाठी, सर्कल ऑफिसरमार्फत अलर्ट केलं आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर शाळा , सार्वजनिक इमारत या ठिकाणी पूरग्रस्त लोंकाची सोय करण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा

ठाण्यातील धबधबा, धरण आणि तलाव परिसरात जाण्यास मनाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा