Advertisement

सोमवारी पावसाचं आगमन होण्याची शक्यता

तथापि, तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, अशी शक्यताही विभागानं व्यक्त केली.

सोमवारी पावसाचं आगमन होण्याची शक्यता
SHARES

पुढील ३-४ दिवसांत मान्सून (Monsson)चं केरळ (Keral)च्या किनारपट्टीवर आगमन होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) व्यक्त केला आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मान्सूनचे आगमन होतं. पण तो ३१ मे रोजीच येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

तथापि, तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, अशी शक्यताही विभागानं व्यक्त केली. ‘स्कायमेट’ (Skymat) या खासगी हवामान संस्थेनंही २-३ दिवसांच्या फरकासह ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

मान्सून (Monsoon) सध्या केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. तौंते चक्रीवादळादरम्यान आणि त्यानंतर केरळमध्ये जोरदार पाऊस झाला होता. गुरुवारपासून पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. या चक्रीवादळानं मान्सूनचा वेग वाढवला होता.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘यास’ (Yass) चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर म्हणजे २७ ते २९ मेपर्यंत आगमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ३० मे ते १ जूनदरम्यान आगमनाची शक्यता आहे.

आतापर्यंत मान्सूनची गती सामान्य आहे. अंदमान-निकोबार द्वीप समूहात २१ मे रोजी आगमन झाल्यानंतर तो सतत उत्तर-पश्चिम दिशेने आगेकूच करत आहे. तो सध्या श्रीलंकेच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला असून गुरुवारी त्याने मालदीवही ओलांडेल.

दरम्यान, गुरुवारी, २७ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Benarji) म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा बैठक घेतली जाईल.

वृत्तानुसार शुक्रवार २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नैसर्गिक आपत्तीच्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगाल इथला दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान प्रथम भुवनेश्वर इथं दाखल होतील आणि तिथं ते राज्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. ओडिशाच्या राजधानीतील बैठकीनंतर पीएम मोदी बालासोर, भद्रक आणि पूर्बा मेदिनीपूर या बाधित भागांचं हवाई सर्वेक्षण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद इथं गुजरातमधील चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. शिवाय, पंतप्रधानांनी तातडीनं १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत गुजरात राज्य सरकारला आणि मृतांच्या नातेवाईक आणि जखमींसाठी जाहीर केली.



हेही वाचा

तौंते चक्रीवादळग्रस्तांना २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा