Advertisement

कुर्ल्यातील कार्यशाळेत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बनविले 'निर्जंतुकीकरण' वाहन

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सॅनिटायझर मशीन बनविली आहे.

कुर्ल्यातील कार्यशाळेत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बनविले 'निर्जंतुकीकरण' वाहन
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. अशातच कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर फवारणीची मशीन बसविण्यात येत आहे. त्यानुसार, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सॅनिटायझर मशीन बनविली आहे.

कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत ‘निर्जंतुकीकरण वाहन’ बसची निर्मिती केली आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या कार्यशाळेत सॅनिटायझर फवारणी मशीनची उभारणी केली आहे. रहदारीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीनं  सॅनिटायझर फवारणी मशीन तयार केली जात आहे.

कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेतील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील एसटी बसमध्ये ‘निर्जंतुकीकरण वाहना’ची निर्मिती केली आहे. बसच्या आतल्या भागात सॅनिटायझर फवारणीची मशीन बसविली आहे. या बस मध्ये सीट काढण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचारी बसच्या पुढच्या दरवाज्यात जातो. सॅनिटायझरच्या फवारणीमधून जातो. त्यानंतर मागच्या दरवाज्यातून बाहेर पडतो. अशाप्रकारे निर्जंतुकीकरण वाहनाची निर्मिती केली आहे.

कर्नाटकच्या एसटी महामंडळाने देशाची अत्याधुनिक ‘मोबाईल सॅनिटायझर’ बसची निर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं निर्जंतुकीकरण वाहनाची निर्मिती केली. राज्यभरात कुर्ला नेहरूनगर, औरंगाबाद, ठाण्याचा कार्यशाळेत प्रत्येकी एक आणि पुण्यातील दापोडी कार्यशाळेत २ अशा एकूण ५बस तयार करण्यात येत आहेत.

एसटी महामंडळाच्या कुर्ला नेहरूनगर आगाराच्या कार्यशाळेतील बस तयार झाली आहेत. नुकताच, एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल डेपोमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे. हि फवारणी मुंबई अग्निशमन दल यांच्यातर्फे ट्रॅक्टरवरून केली होती. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी आता निर्जंतुकीकरण वाहनाची निर्मिती केली आहे.



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

Coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा