Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्राणी दत्तक योजनेला उत्सुर्त प्रतिसाद

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्राणी दत्तक योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्राणी दत्तक योजनेला उत्सुर्त प्रतिसाद
SHARES

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्राणी दत्तक योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्राण्यांच्या संख्येपेक्षा इच्छुक प्राणीपालकांची संख्या जास्त असल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रीय उद्यानात ५ वाघ, १३ बिबटे आणि २ सिंह आहेत. त्यांच्यासाठी अनुक्रमे ७, १४ आणि ३ अर्ज आले आहेत. यापैकी ८ बिबटे आणि २ वाघ काही महिन्यांपूर्वीच दत्तक घेतले गेले आहेत. ३ वाघाटींसाठी (रस्टी स्पॉटेड कॅ ट) ५ अर्ज आले आहेत. ३ नीलगाय, ९ भेकर (बार्किं ग डिअर) आणि ३५ हरिणे या सर्वांसाठीही अर्ज आले आहेत.

वाघ आणि सिंह गेल्या २ वर्षांपासून दत्तकत्वाच्या प्रतीक्षेत होते. प्राणी दत्तक घेणाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्राण्याच्या पिंजऱ्यावरही लावले जाते. दर १५ दिवसांनी संबंधित प्राण्याला काही अंतरावरून पाहण्याची संधी त्याच्या आर्थिक पालकांना दिली जाते.

डिसेंबर २०१३ पासून ही योजना सुरू झाली. यामुळे प्राण्यांच्या संगोपनाच्या खर्चाला हातभार लागत आहेच; शिवाय नागरिकांनाही वन्यजीवांविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. प्रारंभी या योजनेला फारशी प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. त्यामुळे यात काही सेलिब्रिटि आणि राजकारण्यांचा समावेश करण्यात आला.

यात रामदास आठवले, प्रताप सरनाईक यांच्यासारखे राजकारणी, सुमीत राघवन यांच्यासारखे अभिनेते अशा काही नामवंत मंडळींनी प्राणी दत्तक घेतले. मात्र सर्वसामान्यांना योजनेची माहिती व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी पुन्हा परिपत्रक काढण्यात आले. नव्या अर्जांमध्ये सामान्य प्राणीप्रेमींसह दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासारख्या नामवंत मंडळींचाही समावेश आहे.



हेही वाचा

आता वाघ, सिंह आणि इतर प्राण्यांना घ्या दत्तक, SGNP ची नवी योजना

संजय गांधी नॅशनल पार्क सर्वांसाठी पुन्हा खुले, 'या' वेळेत जाण्याची परवानगी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा