Advertisement

पारा घसरला, ११ वर्षातील मुंबईतल्या तिसऱ्या सर्वात थंड दिवसाची नोंद

रविवारी, १३ डिसेंबर रोजी थोडासा रिमझिम पाऊस पडला असताना, भारतीय हवामान खात्यानं (IMD) २०१० नंतरचे तिसरे सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले आहे.

पारा घसरला, ११ वर्षातील मुंबईतल्या तिसऱ्या सर्वात थंड दिवसाची नोंद
SHARES

रविवारी, १३ डिसेंबर रोजी थोडासा रिमझिम पाऊस पडला असताना, भारतीय हवामान खात्यानं (IMD) २०१० नंतरचे तिसरे सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले आहे.

अहवालानुसार, कमाल तापमान २७.६ अंश सेल्सियस होते. मागील दिवसाच्या तुलनेत ते २८.८ अंश सेल्सिअस होते. शिवाय रविवारआधी सर्वात कमी तापमान ६ डिसेंबर २०१७ रोजी २३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. याव्यतिरिक्त, २०१० मध्ये सर्वात कमीतम तापमान २५.५ अंश सेल्सिअस होते.

दरम्यान, आयएमडीने यापूर्वी रविवारी पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. IMDच्या अंदाजानुसार २४ तासांत मुंबईत गडगडाटासह पाऊस कोसळले. शिवाय किमान तापमानातही जवळपास २२ अंश सेल्सिअस घट होईल.

त्याआधी मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी, मुंबईनं डिसेंबरमधील सर्वात उष्ण दिवस अनुभवला. गेल्या दशकातील हा महिन्याचा दुसरा सर्वात उष्ण दिवस होता. सांताक्रूझ हवामान वेधशाळेनुसार मुंबईचे कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सियस होते. जे सामान्यपेक्षा चार अंश सेल्सिअस अधिक होते.

भारत हवामान विभागाचे अधिकारी केएस होसाळीकर यांनी यापूर्वी ट्विटरवर माहिती दिली होती की ११-१२ डिसेंबरपासून उत्तर आणि मध्य भारतातील काही भागात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

होसालीकर यांनी माहिती दिली होती की, अरबी समुद्रामध्ये यूएसी आणि उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या एकत्रित परिणामामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील हवामान हळूहळू ढगाळ असेल. त्यामुळे हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. याव्यतिरिक्त दक्षिण कोकण आणि दक्षिण गुजरातच्या भागातही हलका पाऊस पडण्याची शक्यचा आहे.हेही वाचा

वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, पण भारतात...

अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा