Advertisement

Mumbai Rains: पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता- स्कायमेट

पुढच्या दोन दिवसांत म्हणजे ३ जुलै ते ५ जुलै दरम्यान मुंबईतील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान वेधशाळेने वर्तवला आहे.

Mumbai Rains: पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता- स्कायमेट
SHARES

पुढच्या दोन दिवसांत म्हणजे ३ जुलै ते ५ जुलै दरम्यान मुंबईतील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान वेधशाळेने (Mumbai Likely To Record Three Digit Rains In The Next 24 Hours says Skymet) वर्तवला आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून देखील सुटका मिळू शकते.

सध्याच्या स्थितीत कोकण आणि गोव्याच्या मध्य भागात चक्रीवादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून हळुहळू हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरून उत्तरेकडे सरकत आहे. या हालचालींमुळे पश्चिम आणि दक्षिणेकडून उत्तर कोकण आणि गोवा भागात जोरदार वारे वाहत आहेत. परिणामी मुंबईत पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळी ढगांची गर्दी होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो.

गेल्या काही आठवड्यांपासून दक्षिण उपनगरात अत्यंत मर्यादीत स्वरूपात पाऊस सुरू होता. परंतु मागील ४ दिवसांमध्ये कुलाबा परिसरात पावसाने जोर धरायला सुरूवात केली. या दरम्यान २९४ मिमी पाऊस पडला. तर मागील २४ तासांमध्ये कुलाबा परिसरात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

याचप्रमाणे सांताक्रूझ वेधशाळेने देखील गेल्या आठवड्याभरात अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद केली होती. त्यातही हळूहळू वाढ अपेक्षित आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरात साधरण; सारख्याच पद्धतीचा हलक्या स्वरूपाचा पाऊस या काळात पडलेला आहे.

पुढील २ दिवसांत जोरदार पाऊस अपेक्षित असला, तरी लाॅकडाऊनमुळे रस्त्यावर फारशी वाहने नसल्याने ट्रॅफिक जॅमचा सामना मुंबईकरांना करावा लागेल, असं वाटत नाही. परंतु जोरदार पाऊस झाला, तर मुंबईच्या नेहमीच्या ठिकाणी पाणी तुंबून समस्या निर्माण होऊ शकते. ५ जूननंतरही पाऊस कायम राहणार असला, तरी त्याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा