Advertisement

Mumbai Rain : 8 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain : 8 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
(File Image)
SHARES

भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार आज, 7 सप्टेंबर रोजी हलक्या सरींची अपेक्षा आहे.

तथापि, 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 8 ते 12 सप्टेंबर दरम्यान मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान हवामानात अधिक बदल जाणवेल. दरम्यान, शहरात 200 मिमी इतका पाऊस पडू शकतो.

मुंबईसाठी सप्टेंबर हा सर्वात कमी पावसाचा महिना आहे. 30 वर्षांच्या आकडेवारीवर आधारित (1990-2020) सरासरी मासिक पाऊस 383.5 मिमी इतका आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात हे परिवर्तनशीलता खूप मोठी असते.

सप्टेंबर 2018 मध्ये, केवळ 73.1 मिमी पाऊस पडला. याउलट, सप्टेंबर 2019 हा 1115.7mm सह विक्रमी पाऊस पडला.

माहितीनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये सांताक्रूझमध्ये 94 मिमी पावसाची नोंद झाली. ३० सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा हंगाम असला तरी, मुंबईत ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आणि काहीवेळा नंतरही मान्सूनचा पाऊस सुरूच असतो.

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे.



हेही वाचा

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा