Advertisement

मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो, सातही तलावातील पाणीपातळीत वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर हे या पावसाळ्यात सर्वप्रथम ओव्हरफ्लो झाले.

मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो, सातही तलावातील पाणीपातळीत वाढ
(Representational Image)
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही (Water in the lake ) तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोडकसागर हे तलाव तर ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे फ्रेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांना आरामात (Water Supply) पाणीपुरवठा होईल अशी धरणांची स्थिती आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर हे या पावसाळ्यात सर्वप्रथम ओव्हरफ्लो झाले. 

सध्या या तलावांमध्ये 8 लाख 11 हजार 522 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर मुंबईला दिवसाकाठी 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेसा राहणार आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

यंदा झालेल्या पावसामुळे अप्पर वैतरणा तलावात 99 हजार 268 दशलक्ष लिटर, मोडक सागरात 1 लाख 24 हजार 974 दशलक्ष लिटर, तानसामध्ये 96 हजार 894 दशलक्ष लिटर, भातसामध्ये 3 लाख 66 हजार 113 दशलक्ष लिटर तर तुळशी तलावात 6 हजार 121 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. जो फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 27 जूनपासूनच महापालिकेने 10 टक्के पाणी कपातीस सुरवातही केली होती. राज्यभर पावसाचा लहरीपणा सुरू असला तर मुंबईमध्ये मात्र संततधार सुरु होती. 1 जुलैपासून तर यामध्ये भरच पडली.

गेल्या 13 दिवसांमध्ये पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की पाणीसाठा हा 26 टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे 12 दिवसांमध्येच पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सध्या तलावांमध्ये 56 टक्के पाणीसाठा आहे.

यावेळी कमी वेळेत अधिकचा पाऊस झाल्याने 12 जुलै रोजीच तलाव ओसंडून वाहत आहे. या तलाव क्षेत्रात हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेला पाऊस सध्याही कायम आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मोडक सागर हा तलाव सर्वात आगोदर भरला आहे.


हेही वाचा

राज्यात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा