Advertisement

राज्यात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
SHARES

हवामान खात्याने (Mumbai Rain) येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. तसेच जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावाजवळ नाल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक लोक बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने धाडस दाखवत पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले. चिंचोली नाल्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातून निघालेली ट्रॅव्हल्सची बस शॉर्टकट घेऊन राजुरा तालुक्यातील चिंचोली येथून हैदराबादकडे जात होती. पहाटे 5.30 च्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला.

माहिती मिळताच वीरूर पोलिस ठाण्याच्या पथकाने सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंधारात बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने मोठ्या नाल्यात दोरी बांधून वृद्ध, लहान मुले आणि महिलांना बाहेर काढण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली आहे. नांदेड शहर आणि पुण्यातील शिवणे यांना जोडणारा पूल आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असल्याने या पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पुलावर एक तरुण अडकलेला आढळून आला. खांबावर उभ्या असलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.



हेही वाचा

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा