Advertisement

Mumbai Rains: मागील ३ तासांत मुंबईत पडला १५६ मिमी पाऊस

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शुक्रवारी जोरदार हजेरी लावली आहे.

Mumbai Rains: मागील ३ तासांत मुंबईत पडला १५६ मिमी पाऊस
SHARES

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शुक्रवारी जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून मागील ३ तासांत मुंबईत १५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस पडत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरु झालेल्या पावसानं दुपारपर्यंत जोर कायम ठेवल्यानं कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

मुंबईत प्रमाणापेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यावर मुंबईची तुंबई होते. त्यानुसार यंदाही म्हणजेच शुक्रवारी सुद्धा मुंबईतल्या सखल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचलं. परिणामी या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. जून महिन्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी, जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

शुक्रवार व शनिवार हे २ दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसानं आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे १२ वाजले तरी धो धो कोसळतच होता. या वेळेत पावसाने शहरासह उपनगरात आपला जोर कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळी मुंबईत ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते ९ या वेळेत दक्षिण मुंबईत कुलाबा, नरिमन पॉइंट येथे २५ मिमी पावसाची नोंद झाली.

सकाळी ९ ते १० या वेळेत मलबार हिल, मेमनवाडा, वरळी, दादर, भायखळा, हाजी अली, मुंबई सेंट्रल, धारावी, माटुंगा, कुर्ला, विलेपार्ले या बहुतांश ठिकाणी ४० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. सकाळी १०:३० वाजता हवामान खात्यानं पुढील ३ तासांसाठी मुंबईल पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. हा पाऊस कोसळत असतानाच दादर येथील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे सखल भागात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. पूर्व उपनगरातही पवई, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका आणि पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली आणि गोरेगाव परिसरातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसानं मुसळधार हजेरी लावली.



हेही वाचा -

Mumbai Rains: पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता- स्कायमेट

परीक्षा रद्द; तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा