Advertisement

शाब्बास मुंबईकरांनो, यंदा दिवाळीत कमी प्रदूषण!

शुक्रवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता (aqi) २४२ निर्देशांक अशी मोजण्यात आली. हा स्तर 'वाईट' श्रेणीअंतर्गत येतो. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडवण्यावर घातलेली बंदी आणि प्रदूषणमुक्त दिवाळीबाबतची जनजागृती यामुळे यंदा दिवाळीत प्रदूषणाचा स्तर घटल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शाब्बास मुंबईकरांनो, यंदा दिवाळीत कमी प्रदूषण!
SHARES

मागील २ वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कमी प्रदूषण नोंदवण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचं बीज हळूहळू का होईना परंतु रूजत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता (aqi) २४२ निर्देशांक अशी मोजण्यात आली. हा स्तर 'वाईट' श्रेणीअंतर्गत येतो. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडवण्यावर घातलेली बंदी आणि प्रदूषणमुक्त दिवाळीबाबतची जनजागृती यामुळे यंदा दिवाळीत प्रदूषणाचा स्तर घटल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


'अतिवाईट'वरून 'वाईट'

'सफर' या प्रदूषणमापन प्रणालीतर्फे यावेळेस हवेच्या दर्जाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत केवळ एकच दिवस म्हणजेच पाडव्याच्या दिवशी प्रदूषणाने 'अतिवाईट' हा स्तर गाठला. तर इतर दिवशी ही पातळी 'वाईट' स्तरापर्यंत मर्यादित होती.


सर्वाधिक प्रदूषण कुठे?

दिवाळीत सर्वाधिक प्रदूषण पाडव्याच्या दिवशी नोंदवण्यात आलं या दिवशी निर्देशांक ३०८ वर पोहोचला होता. तर सर्वात कमी प्रदूषण धनत्रयोदशीला नोंदवण्यात आलं. या दिवशी निर्देशांक ८७ वर होता. मुंबईत मालाड, अंधेरी, माझगाव इथं हवेची गुणवत्ता 'अतिवाईट' होती. तर बोरिवली, चेंबूर आणि कुलाबा इथं हवेचा दर्जा 'वाईट' होता.

मुंबईच्या हवेचे गुणवत्ता निर्देशांक-

  • धनत्रयोदशी: ८७

  • नरकचतुर्दशी: १७९

  • लक्ष्मीपूजन: २२१

  • पाडवा: ३०८

  • भाऊबीज: २४२

-दिवाळीनंतरचा अंदाज (१० नोव्हेंबरसाठी): २२१



हेही वाचा-

दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून 'असा' करा बचाव

मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तुरूंगाची हवा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा