Advertisement

Cyclone Tauktae : मुंबईत २ तासात १३२ झाडं पडली

सोमवारी सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.

Cyclone Tauktae : मुंबईत २ तासात १३२ झाडं पडली
SHARES

गेल्या २ दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.

झाडांची पडझड: मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी १६ मे रोजी मुंबईत ५० झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी ८ ते १० या दोन तासात एकूण १३२ झाडे कोसळून पडली आहेत. त्यात शहरात ५९, पूर्व उपनगर १५ आणि पश्चिम उपनगरातील ५८ झाडांचा समावेश आहे. सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. तसेच कुणालाही मार लागला नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

रेल्वेवर झाड कोसळलं: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी लागली. परिणामी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड दूर केलं. ‘मिड-डे’ या दैनिकाने त्याबाबतचं ट्विट केलं आहे.



हेही वाचा -

Cyclone Tauktae : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

Cyclone Tauktae : बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचं नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचं आवाहन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा