Advertisement

मुंबईत २ दिवस रिमझिम पावसाचा आयएमडीचा अंदाज

हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

मुंबईत २ दिवस रिमझिम पावसाचा आयएमडीचा अंदाज
SHARES

भारतीय हवामान विभागानुसार (IMD) मुंबईत ९ मार्चपासून दोन दिवस हलके रिमझिम आणि ढगाळ हवामान राहील. मुंबईत आज, ९ मार्च रोजी सकाळी अंशतः ढगाळ वातावरण होते, परंतु त्यामुळे आर्द्रता आणि तापमानात काही फरक पडला नाही.

आठवड्याच्या शेवटी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बुधवार, ९ मार्चपर्यंत, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेनं कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवलं, तर कुलाबा वेधशाळेत ३३.६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, जम्मू-काश्मीरमध्ये आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच १० मार्चला हवामान स्वच्छ राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दुसरीकडे तापमानात हळूहळू वाढ होत असल्यानं हवामानात बदल होत आहे. तसंच काही ठिकाणी अद्याप थंडीही जाणवत आहे.



हेही वाचा

कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३चे कारशेड आरे वसाहतीत उभारणार?

वांद्रे समुद्रकिनारी पालिका उभारणार 'ट्री हाऊस'

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा