Advertisement

केवळ ३६ टक्के प्रत्यारोपित झाडं जिवंत


केवळ ३६ टक्के प्रत्यारोपित झाडं जिवंत
SHARES

मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच झाडे देखरेखीसाठी तज्ञांची तृतीय पक्षीय समिती नेमली आहे. एमएमआरसीएल तर्फे ३६ टक्के झाडांचं प्रत्यारोपण झाल्याचा दावा केला होता. हा दावा कितपत योग्य आहे याचा तपास तज्ञांची तृतीय पक्षीय समिती करणार आहे

आरे कार शेडच्या बांधकामासाठी हजारो झाडे तोडण्यात आली. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे या बैठकिचे प्रमुख असतील.

उत्तम मेट्रो उभारणारी संस्था आपल्या झाडांची देखभाल करण्यास असमर्थ आहे हे कसं असू शकतं? वृक्षांची काळजी घेण्यास तज्ञांची कमतरता नाही. तर वृक्षांची काळजी घेण्यास इच्छाशक्ती कमी पडत आहे.

जोरू बताना, आरे कार्यकर्ता


एमएमआरसीएलचा या प्रयोगाची सुरुवातीपासूनच शाशंका नव्हती. नागरिकांनी केलेल्या कठोर पाठपुराव्यामुळेच वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. झाडांचं प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक ती वाहनं, त्यांच्या देखभालीसाठी तज्ञांची नेमणूक या सर्वांचीच कमतरता आहे. जेसीबी वापरून तोडलेल्या झाडांचं अशा ठिकाणी प्रत्यारोपण करण्यात आलं जिथं लोकांना त्यांची अवस्था दिसणार नाही. यासाठी एमएमआरसीएलकडून दंड आकारला गेला पाहिजे.

स्टॅलिन दयानंद, वनशक्ती

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)च्या वकिलांनी पॅनेलच्या बैठकीत एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये असे म्हटले आहे की १ हजार ५८२ वृक्षांचे रोपण करण्यात आलं आहे. त्यापैकी ३६ टक्के म्हणजे ५७२ जिवंत आहेत. तर ९७२ मरण पावले आहेत. 


हेही वाचा

आरेप्रकरणी सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा