Advertisement

मुंबईतील प्रदूषणात वाढ; हवेचा दर्जाही खालावला

लॉकडाऊनमुळं मागील ६ महिन्यांपासून बंद असलेले कारखाने, मोठ्या कंपन्यांचं काम पुन्हा सुरू झालं आहे.

मुंबईतील प्रदूषणात वाढ; हवेचा दर्जाही खालावला
SHARES

मुंबईत कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आलं होतं. मात्र, आता हळूहळू मुंबई पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमुळं मागील ६ महिन्यांपासून बंद असलेले कारखाने, मोठ्या कंपन्यांचं काम पुन्हा सुरू झालं आहे. त्याशिवाय, रस्त्यावर वाहनांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळं मुंबईतील प्रदूषणात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊन काळात महामुंबईतील प्रदूषण कमालीचं कमी झालं होतं. मात्र, आठवडाभरापासून मुंबईत प्रदूषणाचे (mumbai pollution) धुरकेदेखील दिसू लागले असून, मुंबईतील अनेक भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अनुभव येत आहे.

हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्रानं (सफर) दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत शहरातील वायुप्रदूषण पातळी मध्यम असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक ८५ यूएस एक्‍यूआय नोंदवला गेला आहे. तसंच, वातावरणातील (environment) मुख्य प्रदूषक पीएम १० इतका नोंदवला गेला आहे. शनिवारपासून मुंबईत धुराचे पातळ थर वाढले असून, प्रदूषणाच्या पातळीत वाढ दिसून येत आहे.

'सफर' या संस्थेनं नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार शहरातील हवेचा एक्‍यूआय मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ५० च्या खाली होता. मात्र, शुक्रवारी मुंबईत नोंदवण्यात आलेल्या एअर क्वालिटी इंडेक्‍स (एक्‍यूआय) २१ मार्चच्या लॉकडाऊननंतर आणि जुलैपासून टप्प्याटप्प्यानं सुरू झालेल्या वाहतुकीनंतर ११८ मध्यम स्वरूपाच्या एक्‍यूआयसह सर्वाधिक वाईट नोंदवण्यात आला आहे.

सफरनं नोंदवलेल्या निरीक्षणांतून यापूर्वी बदललेल्या हवामानानुसार वांद्रे कुर्ला कॉम्लेक्‍समधील (बीकेसी) हवेची गुणवत्ता सातत्यानं घसरली होती. मात्र आता बीकेसीतील हवा हळूहळू सुधारत असून, सफर संस्थेनं या परिसरातील हवा उत्तम दर्जाची नोंदवली आहे.

मुंबई शहरापाठोपाठ भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरिवली, चेंबूर या ठिकाणची हवा उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. तसंच, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम स्वरूपाची नोंद करण्यात आली आहे. मालाड, अंधेरी, नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे.



हेही वाचा -

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा