Advertisement

सायकल रॅलीतून सह्याद्रीची जनजागृती


सायकल रॅलीतून सह्याद्रीची जनजागृती
SHARES

मुंबई - सह्याद्री पर्वताची ऱ्हास रोखण्यासाठी तसंच पर्यावरणवादी कार्यकर्ते, संघटनांना एकत्र आणण्यासाठी अश्वमेध प्रतिष्ठाननं सह्य़ाद्री वाचवा अभियान हाती घेतलंय. या अभियानात 1200 किलोमीटरचा पल्ला 50 सायकलस्वार पार करणारायेत. १ ते ९ डिसेंबर या कालावधीत ही सायकल रॅली पार पडणाराय.
नवापूर ते महाबळेश्वर आणि सावंतवाडी ते महाबळेश्वर अशा दोन मार्गावर प्रत्येकी २५ सायकलस्वार आणि कार्यकर्त्यांचा एक गट सहभागी होणाराय. रॅलीचा संपूर्ण मार्ग सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी आणि घाटमाथ्यावरील लहान-लहान गावांतून होणाराय. या संपूर्ण प्रवासात एकूण 36 थांबे असणारायेत. या प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण, पर्यावरणाची सद्यस्थिती मांडून जनजागृती करण्यात येणाराय.
तसंच सहयाद्रीच्या पायथ्याशी 101 पेक्षा जास्त पथनाट्य सादर करणार असल्याचं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सांगितलं. मुंबई विदयापीठात आयोजित सहयाद्री वाचवा मोहिमेच्या परिसंवादावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा