Advertisement

वेळेआधीच दाखल होणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.

वेळेआधीच दाखल होणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

येत्या 4 आठवड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे.

दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून अंदमानमध्ये हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.'

 दरम्यान, असनी चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटका, केरळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. एक-दोन दिवस असेच वातावरण पाहायला मिळणार आहे.

कोकणात काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तर विदर्भात पाऊस आणि उष्णतेचा कहर पाहायला मिळेल.



हेही वाचा

मुंबईत ढगाळ वातावरण, चक्रिवादळाचा परिणाम

आदित्य ठाकरेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळला, पवईत सायकल ट्रॅकला नकार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा