Advertisement

देशात चक्रिवादळ आणि अतिवृष्टीच्या प्रमाणात वाढ : केंद्र सरकार

आधीच्या तुलनेत उत्तर हिंद महासागरावरील तीव्र चक्रीवादळांची संख्या अलिकडच्या वर्षांत वाढली आहे.

देशात चक्रिवादळ आणि अतिवृष्टीच्या प्रमाणात वाढ : केंद्र सरकार
SHARES

उत्तर हिंद महासागरावरील तीव्र चक्रीवादळांची संख्या अलिकडच्या वर्षांत वाढली आहे. मंत्रालयाच्या मते, ज्या भागात चक्रीवादळाचा वेग वाढला आहे त्यात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा समावेश आहे. त्याशिवाय २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं अति मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं बुधवारी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, १८९१ ते २०१७ दरम्यान प्रत्येक वर्षी उत्तर हिंद महासागरामध्ये सरासरी ५ चक्रीवादळे तयार होत असतात. पण २०१८ आणि २०१९ मध्ये ही संख्या वाढली आहे. २०१८ मध्ये ७ आणि २०१९ मध्ये ८ चक्रीवादळ निर्माण झाले.

मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळांपैकी पाच चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली. तर १९०२ पासून त्यांची संख्या दरवर्षी एकनं वाढू लागली.

मंत्रालयात असंही म्हटलं आहे की, २०१९ मध्ये तीव्र चक्रीवादळांची संख्या वाढेल. २०१८ मध्ये तयार झालेल्या सात चक्रीवादळांपैकी सहा गंभीर तीव्रतेचे होते. तर गेल्या वर्षीच्या आठ चक्रीवादळांपैकी सात गंभीर तीव्रतेचे होते. जरी गंभीर तीव्रतेच्या चक्रीवादळांची संख्या वाढली असली तरी, २०१३ नंतर झालेल्या नुकसानाचा धोका दुहेरी आकड्यांपुरता मर्यादित करण्यात आला आहे.

अलिकडच्या वर्षांत मुसळधार पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात मंत्रालयानंही आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, गेल्या वर्षी देशभरातील ५५४ हवामान केंद्रांवर अतिवृष्टी (२० सेमीपेक्षा जास्त) नोंदवली गेली. तर देशातील ४००० हवामान केंद्रांपैकी ३०५६ केंद्रावर अधिक अतिवृष्टी नोंदवण्यात आली.

याउलट, २०१७ मध्ये, २६१ केंद्रावर मुसळधार पाऊसाची नोंद करण्यात आली. तर १ हजार २८४ केंद्रावर अधिक अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय हवामान खात्यानं (IMD) चक्रीवादळांना लवकरात लवकर चेतावणी देण्याची उत्कृष्ट क्षमता दर्शवली आहे. त्यांच्या कामाची राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर स्तुती करण्यात आली आहे. त्याच अचूकतेमुळे मृत्यूची संख्या कमी झाली आहे.

यावर्षी जाहीर झालेल्या अहवालात, पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे की, १९५० नंतर देशात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर मध्यम पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. याव्यतिरिक्त, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेनं (IITM) केलेल्या अभ्यासानुसार, पश्चिमेकडील किनारपट्टी आणि मध्य भारतात १९५० ते २००५ दरम्यान मुसळधार पाऊसात तीन पट वाढ झाली आहे.



हेही वाचा

पावसानं मारली दडी, मोडकसागर तलावातील जलसाठ्यात घट

आरेतील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा