Advertisement

12 रेल्वे प्रकल्पांसह मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे अपग्रेडेशन

चालू मार्गांवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच सेवा वाढवण्यासाठी आणि मुंबईतील उपनगरीय प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे अपग्रेडेशन आवश्यक आहे.

12 रेल्वे प्रकल्पांसह मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे अपग्रेडेशन
SHARES

मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने 16,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. रेल्वे प्रशासनाने मुंबई (mumbai) उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे अपग्रेडेशन (upgradation) करण्यावर भर दिला आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी अधोरेखित केले की, चालू मार्गांवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच सेवा वाढवण्यासाठी आणि मुंबईतील उपनगरीय (mumbai local) प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे अपग्रेडेशन आवश्यक आहेत.

सरकारने 16,241 कोटी रुपयांच्या 12 पायाभूत सुविधा उपक्रमांना मंजुरी दिली आहे. ज्यामुळे आधुनिकीकरण आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या भारतीय रेल्वेच्या समर्पणाला बळकटी मिळाली आहे.

या प्रकल्पांमध्ये, प्रत्येक प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी समाविष्ट आहे:

सीएसएमटी-कुर्ला लाईन्स 5 आणि 6 (17.5 किमी 891कोटी रुपये)

मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी लाईन (30 किमी 919 कोटी रुपये)

गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी 826 कोटी रुपये)

बोरिवली-विरार 5वी आणि 6वी लाईन (26 किमी 2,184 कोटी रुपये)

विरार-डहाणू रोड 3री आणि 4थी लाईन (64 किमी, 3,587 कोटी रुपये)

पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग (29.6 किमी 2782 कोटी रुपये)

ऐरोली-कळवा एलिव्हेटेड सबर्बन कॉरिडॉर कनेक्शन (3.3 किमी 476 कोटी रुपये)

कल्याण-आसनगाव चौथी लाईन (32 किमी 1,759 कोटी रुपये)

कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन (14 किमी 1,510 कोटी रुपये)

कल्याण-कसारा तिसरी लाईन (67 किमी 793 कोटी रुपये)

नायगाव-जुईचंद्र दुहेरी ट्रॅक लाईन (6 किमी 176 कोटी रुपये)

निळजे-कोपर दुहेरी ट्रॅक लाईन (5 किमी 338 कोटी रुपये)

शिवाय, भारतीय रेल्वेने 238 नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करण्याचा मानस केला आहे ज्यामध्ये स्वयंचलित दरवाजे असतील जे गर्दीमुळे होणाऱ्या घटना कमी करून प्रवाशांची सुरक्षितता सुधारतील.



हेही वाचा

ओला-उबेर संप संपल्यानंतर टॅक्सी भाड्यात 50 टक्क्यांनी वाढ?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा