Advertisement

मुंबईचं तापमान पुन्हा जाणार ४० अंशांवर

मुंबईत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, येत्या काही दिवसांच या तपमानात आणखी वाढ होण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईचं तापमान पुन्हा जाणार ४० अंशांवर
SHARES

मुंबईत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, येत्या काही दिवसांक या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबईतील तापमान ३३-३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १७ एप्रिलदरम्यान मुंबईत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


स्कायमेटचा अंदाज

'स्कायमेट' या खाजगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १२ ते १७ एप्रिलपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, १३ एप्रिल आणि १८ एप्रिलदरम्यान तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


कमाल तापमान ३३.१ अंश

वाढत्या तापमानामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सियस होतं. याआधी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच मुंबईच्या तापमानात ३५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. त्यामुळं गार वाऱ्याचा सुखद अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाची झळ सहन करावी लागली होती.हेही वाचा -

बोगस कंपन्यांच्या मदतीनं सरकारची १२० कोटी रुपयांची फसवणूक, ३ व्यापाऱ्यांना अटक

जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडलेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा