Advertisement

मुंबईच्या तापमानात घट, जोरदार पावसाची शक्यता


मुंबईच्या तापमानात घट, जोरदार पावसाची शक्यता
SHARES
Advertisement

मुंबईत निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.

मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेनुसार, मुंबईचं किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस व कमाल तापमान २५.८ अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं आहे. तसंच, कुलाबा वेधशाळेनुसार किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस व कमाल तापमान २६.४ अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं आहे.

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या काही भागात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. तर नवी मुंबईसह ठाणे शहरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत पुढील ३ तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. याबाबत इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण आणि अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरु झाला. 

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे . संपूर्ण मुंबईवर सकाळपासून काळ्या ढगांची छाया दिसून आली. हेही वाचा -

अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

बीकेसीतील कोविड रुग्णालय पूर्ण सुरक्षित, बीएमसीचा खुलासासंबंधित विषय
Advertisement