Advertisement

हॉर्नचा कर्कश आवाज बदलणार, भारतीय संगीत वापरणार

केंद्रीय वाहतूक मंत्रालय हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्या जागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार आहे.

हॉर्नचा कर्कश आवाज बदलणार, भारतीय संगीत वापरणार
SHARES

केंद्रीय वाहतूक मंत्रालय हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्या जागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार आहे. मंत्रालयाकडून लवकरच या बाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमात दिली.

भारतीय वाद्य ज्यात, तबला, पेटी, तानपुरा, बासरी चे सुमधुर सूर ऐकू हॉर्नमधून येणार आहेत. त्यामुळे प्रवास करताना आता तुम्हाला गर्दीत कर्णकर्कश आवाज ऐकू न येता सुमधुर संगीत पुढच्या काळात ऐकायला मिळेल.

देशात वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे त्यातही अनेक जण मोठ्या आवजाचे हॉर्न गाडीला लावतात. विनाकारण हॉर्न वाजवून वाहन चालकांचं लक्ष विचलित करतात. निष्काळजी पणानं हॉर्न वाजवल्यानं अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. यासोबतच ध्वनी प्रदूषण देखील वाढतं.

नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना काही दिवस आधी दिल्या आहेत. लवकरच काढण्यात येणाऱ्या अध्यादेशानुसार भारतीय वाद्यांचे सूर हॉर्न मध्ये वापरण्याची सूचना दिली आहे.

मोदी सरकारच्या वाहनं भंगारात काढण्याच्या धोरणामुळे अनेकांच्या मनात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जुनी वाहनं भंगारात काढणं का गरजेचं आहे, हे स्पष्ट केलं होते. गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ग्राफिक्स शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी जुन्या वाहनांमुळे काय धोका उद्भवू शकता, याचा साद्यंत तपशील त्यामध्ये देण्यात आला होता.

वाहनं भंगारात काढण्याचं धोरण जाहीर केल्यानंतर केंद्र सरकार पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. फेम-1 योजनेला मिळालेल्या यशानंतर केंद्रानं १० हजार कोटींची फेम-2 योजना अंमलात आणली आहे.



हेही वाचा

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा