Advertisement

उद्धव ठाकरेंचा शपथविधी : १०० आरे कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला हजेरी

शपथविधीला आरे बचाव मोहिमेला पाठिंबा देणारे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत. जवळपास ५० ते १०० कार्यकर्ते शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी : १०० आरे कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला हजेरी
SHARES
Advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम दादरच्या शिवाजी पार्क इथं होणार आहे. या शपथविधीला आरे बचाव मोहिमेला पाठिंबा देणारे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत. जवळपास ५० ते १०० कार्यकर्ते शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आरेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी हे कार्यकर्ते येणार आहेत


आरे कार्यकर्त्यांना आशा

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेडच्या बांधकामासाठी आरे कॉलनी इथं झाडे तोडण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. शिवाय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील एकदा या निषेधात सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसनंही त्यांच्या प्रचारादरम्यान हा विषय गांभीर्यानं घेतला होता. आता हे तिन्ही पक्ष सरकार स्थापनेसाठी एकत्र येत असल्यानं कार्यकर्त्यांसाठी हा एक आशेचा किरण आहे.


वचनाची आठवण करून देण्यासाठी... 

आम्हाला समजले आहे की उद्धव ठाकरे यांना आज भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं कठीण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही बॅनरबाजी करू शकत नाही. पण केवळ सरकारला त्यांनी आरेबाबत दिलेल्या वचनाची आठवण करुन देण्यासाठी जवळपास १०० आरे कार्यकर्ते शिवाजी पार्क इथं जाणार आहोत.

- यश मारवाह, आरे कार्यकर्ते आणि लेट इंडिया बीटचे संस्थापक


आरेला वन घोषित करावे

काही दिवसांपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीनं आरे इथं आणखी वृक्षतोड होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. परंतु सध्याच्या घडीला सुरू असलेलं तिथलं बांधकाम थांबवण्याविषयी पुढे काही भाष्य केलं नाही. आरे याचिकाकर्ते झारू बाथेना आणि स्टॅलिन दयानंद यांनी आरेला वन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. कारण वनस्पती आणि तिथल्या प्राण्यांना जगवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

#AareyKaShraap 

विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर #KyaHuaTeraVaada (क्या हुआ तेरा वादा) ट्विटरवर ट्रेंड करत होते. युझर्सनी केलेल्या ट्वीट्समध्ये आरेला वाचवण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येत होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर #AareyKaShraap (आरे का श्राप) ट्विटरवर ट्रेंड होताना दिसला.हेही वाचा

मेट्रोनं पुर्नरोपीत केलेल्या झाडांची बघा 'अशी' झालीय दयनीय अवस्था

बीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित

संबंधित विषय
Advertisement