Advertisement

बर्थ डे गर्ल सईचं गरजू मुलांना सहकार्य

काही कलाकार पुढच्या पिढीसाठी नवनवीन आदर्श निर्माण करत असल्याचं वारंवार पहायला मिळतं. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरनं आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत गरजू मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

बर्थ डे गर्ल सईचं गरजू मुलांना सहकार्य
SHARES

काही कलाकार पुढच्या पिढीसाठी नवनवीन आदर्श निर्माण करत असल्याचं वारंवार पहायला मिळतं. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरनं आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत गरजू मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.


संवेदनशील अभिनेत्री

सौंदर्यासोबतच आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर सईनं आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. मराठीसोबतच हिंदीतही तिच्या अभिनयाचा बोलबाला आहे. पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी, वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणं साकारणारी, तरुणाईच्या मनावर राज्य करणारी सई खूप संवेदनशील अभिनेत्री आहे. खासगी जीवनात ती नेहमीच समाजकार्य करण्यासाठी पुढाकार घेत असते. सईहोलिक्स या फॅनक्लबच्या माध्यमातूनही सई समाजातील दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे करत असते.


शालेय वस्तूंचं वाटप 

सईनं आपला वाढदिवसही अशाच काहीशा अनोख्या पद्धतीनं साजरा करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सईच्या वाढदिवसानिमित्त दरर्षी सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता. तर यंदा त्यांनी पुण्यातील सुमारे १०० गरजू मुलांना वह्या-पुस्तकं, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचं वाटप केलं. सईच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फिरत असलेल्या 'सई बर्थडे ट्रक'नं गरीब मुलांना खाऊचं वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. 


सामाजिक कार्यावर भर 

सईहोलिक्स या उपक्रमाविषयी सांगायचं तर, सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते. सईचा हा विचार पुढे नेतच फॅनक्लबनंही तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलं. म्हणूनच यंदा गरजू मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी सईहोलिक्सच्या माध्यमातून खाऊचं आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे.


सईचं वचन

नेहमी ग्लॅमरस लुकमध्ये वावरणारी सई याबाबत म्हणाली की, माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली हे मी माझं भाग्य समजते. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा फॅनक्लब असणं, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मीदेखील माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन असं वचनही अनाहुतपणं सईनं आपल्या चाहत्यांना दिलं आहे.



हेही वाचा  -

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा