Advertisement

छायासोबत असं काय घडणार?

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं नेहमीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. सध्या या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यात छायासोबत काहीतरी अघटीत घडणार आहे.

छायासोबत असं काय घडणार?
SHARES

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं नेहमीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. सध्या या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यात छायासोबत काहीतरी अघटीत घडणार आहे. 


नाट्यमय वळणं

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २' मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. अनेक नाट्यमय वळणं घेत आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे.


नाईलाजानं लग्नास होकार

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि, छायाचं राजग्या बरोबरचं प्रेमप्रकरण सगळ्यांसमोर उघड होतं म्हणून अण्णा तिच्यावर जबरदस्ती करून तिला खोलीत डांबून ठेवतात. अशाच परिस्थितीत एक स्थळ तिला बघायला येतं आणि ते दोघेही एकमेकांना होकार देतात. राजग्याचा जीव वाचावा म्हणून नाईलाजानं छाया लग्नास होकार देते. एक मोठा भाऊ म्हणून माधव गोष्टी नीट करायचं असं ठरवतो, पण तसं काही घडत नाही. नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. त्यामुळं माधवच्या प्रयत्नांना यश येत नाही. करायला जातो एक आणि घडतं भलतंच.


संकट कोसळणार 

छायावरील होणारा अन्याय सहन न झाल्यामुळं थेट माधव घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो. आता छायाचं लग्न दोन दिवसात होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, पण छायाचं लग्न झाल्यावर त्याच दिवशी तिच्यावर एक संकट कोसळणार आहे. लग्नाच्याच रात्री तिच्या आयुष्यातील सगळ्यात दुर्दैवी घटना घडणार आहे. छायासोबत काय अघटित घडणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. विशेष म्हणजे छायावर जेव्हा हे संकट कोसळणार तेव्हा तिच्या मदतीला माधव नसणार. त्यामुळं या अघटीत घटनेला ती कशा प्रकारे सामोरी जाणारं हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.हेही वाचा  -

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'
संबंधित विषय
Advertisement