का भिडले वीणा-आरोह?

नवा आठवडा, नवा वाद हे बिग बॉसच्या घरातील समीकरणाला हा आठवडा अपवाद ठरलेला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीलाच वीणा आणि आरोह आपसात भिडल्याचं पहायला मिळणार आहे.

  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
  • का भिडले वीणा-आरोह?
SHARE

नवा आठवडा, नवा वाद हे बिग बॉसच्या घरातील समीकरणाला हा आठवडा अपवाद ठरलेला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीलाच वीणा आणि आरोह आपसात भिडल्याचं पहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांवरून भांडणं होतच असतात. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नसतं. शब्दाला शब्द वाढत जातो आणि त्याबरोबर वाद देखील विकोपाला पोहचतो. आता वीणा आणि आरोहमध्ये वादावादी होणार आहे. वीणानं हीनाला असं म्हटलं की, आरोहला सगळ्यांपासून प्रॉब्लेम आहे. याचाच जाब आरोह वीणाला विचारणार आहे. त्यावर वीणानं असं हीनाला सांगितल्याचं कबूल देखील केलं आणि ती असं का म्हणाली याचं स्पष्टीकरण देखील दिलं.

आरोह म्हणाला की, तुला सगळ्याच बाबतीत इश्यू असतो, तुला अनावश्यक गोष्टीचा त्रास होतो. त्यावर आरोहचं म्हणणं आहे की, तू कोण ठरवणारी कोणती गोष्ट आवश्यक आहे कोणती नाही? त्यावर वीणा म्हणाली की, तू कोण ठरवणारा मी काय करणार आणि काय नाही? दोघांचं तू तू मैं मैं सुरू राहिलं आणि वाद वाढतच गेला. वीणानं सांगितलं की, या घरामध्ये तू नाही ठरवणार मी काय करायचं आणि मी नाही ठरवणार तू काय करायचं. वीणाचं अशाप्रकारे बोलणं आरोहला आवडलं नाही. तो तिला म्हणाला की, हा अॅटीट्यूड घरी ठेव. कोणत्या मुद्दयावरुन वीणा–आरोहमध्ये वाद सुरू झाला? वीणानं आरोहला कोणता टोंबणा मारला? हे पुढे समजेलच.

एकीकडं वीणा आणि आरोहचा वाद सुरू होता, तर दुसरीकडं नेहानं बिचुकलेला पाण्यात उभं राहण्याची शिक्षा दिली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांचं उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे आणि तसं जर कोणत्या सदस्यानं केलं, तर तो सदस्य शिक्षेस पात्र ठरतो. अभिजीत बिचुकले बर्‍याचदा या घराच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतो. आता बिचुकले पुन्हा एकदा नियम मोडताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे. तसं केल्यास कोंबडा आरवतो हे माहिती असताना देखील बिचुकलेनं तो नियम पुन्हा मोडला.

शिवानीचं म्हणणं होतं की, आता त्यांना आतमध्ये म्हणजेच अडगळीच्या खोलीमध्ये टाक. तर नेहा म्हणाली की, मी त्यांना कालच सांगितलं आहे. आता मी पाण्यात उभं करणार आहे. नेहा आता बिचुकलेला स्वीमिंग पूलमध्ये उभं रहाण्याची शिक्षा देणार आहे. बिचुकलेचं त्यातही म्हणणं आहे की, पूर्ण उभा नाही राहू शकत, तर नेहा देखील पाण्यात उतरली. नेहाचं म्हणणं होतं की, तुमची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे. पूर्ण पाण्यात उभं रहा, नेहानं सदस्यांना त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली. शिक्षेमध्ये देखील बिचुकले काही ना काही मजेचा मुद्दा शोधतो आणि घरातल्यांचं मनोरंजन करतो.हेही वाचा -

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'

'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमालसंबंधित विषय
ताज्या बातम्या